‘माझा नवरा मुस्लिम आहे त्याला द केरला स्टोरी चित्रपट आवडला’; बॉलिवूड अभिनेत्रीचं ट्वीट चर्चेत

The Kerala Story : ‘द केरळ स्टोरी’ने भारतात १०० कोटींचा टप्पा गाठला आहे. केरळ स्टोरी या चित्रपटाला भारतातही चांगला प्रतिसाद मिळत आहे तर दुसरीकडे या चित्रपटावरून वाद सुरू आहे. हा चित्रपट प्रोपगंडा आहे असं अनेक राजकीय नेत्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने तिच्या नवऱ्याबरोबर हा चित्रपट पाहिला आणि त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या या प्रतिक्रियेची सध्या चांगलीच चर्चा आहे.

देवोलिना भट्टाचार्जी म्हणाली की, नेहमीच असं नसतं. माझा नवरा मुस्लिम आहे. तो माझ्याबरोबर द केरला स्टोरी चित्रपट पाहायला आला होता. त्याला हा चित्रपट आवडला. हा चित्रपट पाहून तो नाराज झाला नाही. हा चित्रपट त्याच्या धर्माच्या विरूद्ध आहे असंही त्याला वाटलं नाही. प्रत्येक भारतीयाने असं असलं पाहिजे असं मला वाटतं.

देवोलिनाचं हे ट्वीट सध्या चांगलच चर्चेत आहे. यावर अनेकांनी विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी देवोलिनाच्या या ट्वीटचं कौतुक केलं आहे, तर काहींनी यावरून तिला ट्रोल केलं आहे.