वर्धा – समुद्रपूर तालुक्यातील नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ च्या शेडगांव पाटीजवळ भीषण अपघात झाला आहे. खासगी ट्रॅव्हल्स व दुचाकीत हा अपघात झाल्याचे कळते. दुचाकीला धडक देऊन ट्रॅव्हल्स दरीत कोसळल्याने ५ हून अधिकजण ठार झालेत. तर ३० हून अधिक जखमी असण्याची शक्यता आहे.