टिटवाळा – नागपुर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे डब्बे आसनगाव-वासिंदजवळ घसरले असल्याची माहिती समोर येत आहे.
सकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना आसनगाव-वासिंद रेल्वे स्थानकादरम्यान घडली. दुर्घटनेत एक्स्प्रेसच्या इंजिनासह सात डबे रुळावरून घसरले आहेत. अपघातात काही जण जखमी झाले असून त्यांना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सविस्तर वृत्त लवकरच अपडेट करण्यात येईल.