विरोधकही अफवांचे लोन पसरवत आहेत

0

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

नागपूर- सध्या राज्यात अफवांचे लोन पसरवून मारहाणीच्या घटना वाढल्या आहेत. काही लोकं अफवा पसरवण्याचं काम करत आहेत, त्यात विरोधकांनी आज त्यांच्या पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांनी भर घातली आहे. या राजकीय अफवांना आमच्याकडून वस्तुस्थिती आणि राजकीय पद्धतीने उत्तर दिले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर येथे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकार खुल्या मनाने या अधिवेशनाला सामोरे जात आहे, विरोधकांनी अधिवेशन चालू द्यावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

230 ठिकाणी बोर्डस लावून जनजागृती
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, धुळ्यातल्या अफवेमुळे मृत्यूच्या प्रकरणानंतर एक मोठी मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. 230 ठिकाणी बोर्डस लावून जनजागृती करण्यात येत आहे. अफवा रोखण्यासाठी ऍड कॅम्पेन सुरू केले आहे. विशेषतः सोशल मीडियावर क्रिएटिव्हस तयार करून अफवा कशा पसरवल्या जातायत ते सांगण्याचा प्रयत्न करतोय, असे ते म्हणाले. धुळ्याच्या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून दोषींना कठोर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. अफवा पसरवू नका, अन्यथा त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी दुधाच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दुधाला भुकटी मध्ये कन्व्हर्ट करण्याचा निर्णय झाला, मात्र दुधाचे भाव कमी झालेला नाही. दुधाच्या संदर्भात समग्र धोरण सरकार याच अधिवेशनात जाहीर करून दूध उत्पादकांना दिलासा देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. सोबतच तूर -हरभरा खरेदी मध्ये अनियमितता करणाऱ्या चेतावणी देत अशा प्रकरणांकडे सरकारचे लक्ष आहे, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

230 ठिकाणी बोर्डस
नवी मुंबई जमीन घोटाळा प्रकरणी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, हा सिडकोचा भूखंड नाही, रेडीरेकनर दरानुसार या जमिनीची किंमत 5 कोटी 30 लाख आहे. 200 सातबारा वाटप केल्याची विक्री झालेली आहे. जमीन देण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना नसतात तर जिल्हाधिकाऱ्यांना असतात, मागच्या 30 वर्षांपासून हा नियम असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणी विरोधकांना जी चौकशी हवी त्यासाठी राज्य सरकार तयार आहे, असेही ते म्हणाले. भतीजा या बिल्डरचं नाव घेतलं मात्र मागच्या सरकार मध्ये या भतीजांचे चाचा कोण होते याची माहिती ही दिली जाईल, असेही ते म्हणाले. नाणार प्रकल्पावर बोलताना यावेळी मुख्यमंत्री नाणार संदर्भात शिवसेनेशी भूमिका समजून घेतली आहे. आम्ही कोणावर प्रकल्प थोपवणार नाही. याविषयी उद्योग मंत्री त्यांची भूमिका नंतर मांडतील, असे ते म्हणाले.