भुसावळ – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग व भुसावळ कला, विज्ञान आणि पू. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.26 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हास्तरीय ताण-तणाव मुक्त/ कॉपीमुक्त परीक्षा अभियान कार्यशाळा संपन्न झाली. क.ब.चौ.उमवी जळगाव जिल्हा परिषेत्रातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांनी यात सहभाग नोंदविला. कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली. कार्यशाळेच्या उद्घाटनास व्यासपीठावर ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय मोहनभाऊ फालक, सचिव आदरणीय विष्णूभाऊ चौधरी, कोषाध्यक्ष आदरणीय संजयजी नाहाटा, प्राचार्य डॉ. एस.व्ही. पाटील, प्रा.डॉ.जयंत लेकुरवाळे संचालक विद्यार्थी विकास विभाग क.ब.चौ. उ.म.वि.जळगाव, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए.डी.गोस्वामी , विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. व्ही.ए. सोळुंके तसेच कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. विणा महाजन सामाजिकशास्त्रे प्रशाळा विभाग क.ब. चौ.उमवी,जळगाव उपस्थित होत्या. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास कल्याण अधिकारी प्रा. व्ही.एस. सोळुंके यांनी केले. डॉ. जयंत लेकुरवाळे संचालक ,विद्यार्थी विकास विभाग क.ब.चौ.उ.म.वी. जळगाव यांनी ‘तणावमुक्त विद्यार्थीच आपल्यातील सर्वोत्तम देऊ शकतो’ असे सांगितले. विद्यार्थ्यांची अभ्यास, परीक्षा याविषयी बदलत चाललेली मानसिकता, ताण तणाव, परीक्षेविषयीची भीती यातून होणारी कॉपी. यासाठी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत बदल घडविणे. अभ्यासासाठी संदर्भ पुस्तकांचा वापर वाढविणे तसेच विद्यापीठाच्या परीक्षा व नियमानविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे. ताण-तणाव/ कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविताना काय केले पाहिजे अशा विविध बाबी समजावून सांगितल्या. अध्यक्षीय भाषणात ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय मोहन भाऊ फालक यांनी ज्या महाविद्यालयात कॉप्यांचा सुळसुळाट आहे त्या ठिकाणी पालकांची तथा मुलांची प्रवेश घेण्याची मानसिकता अतिशय दुर्दैवी असल्याचे नमूद करत सशक्त भारतासाठी समृद्ध पिढी निर्माण करायची असेल तर योग्य मूल्यमापन होणे आवश्यक असल्याचे मत प्रतिपादित केले.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रात डॉ. विणा महाजन यांनी “ताण -तणाव समस्या स्वरूप आणि उपायोजना” या विषयावर मार्गदर्शन केले तर कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात प्रा. दीपक दलाल यांनी “कॉपीमुक्त परीक्षा अभियान” या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या समारोप सत्राचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी.एच. बरहाटे सर यांनी भूषवले. कार्यक्रमाचे आभार तथा सूत्रसंचालन प्रा.संगीता भिरुड यांनी केले कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. गौतम भालेराव प्रा. डॉ. दिनानाथ पाठक प्रा. डॉ.सचिन राजपूत प्रा. साहेबराव राठोड प्रा. एस.टी.धुम डॉ. किरण वारके प्रा.अक्षरा साबळे प्रा. राजेंद्र तायडे तसेच विद्यार्थी अमोल गुजर, हेमंत ठोसर, शिवानी पाटील यांनी काम पाहिले.