आपण 22 बोटे किंवा 21 बोटे असलेले मुले ऐकले परंतु न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये एका २० वर्षीय गरोदर मातेने चक्क २६ बोटे असलेल्या एका बालकाला जन्म दिला आहे. सदर महिलाही मध्य प्रदेशातील रहिवासी असून तिला प्रसूती वेदना होत असल्याने तिला मध्यरात्री तीन वाजता न्हावी रुग्णालयात आणण्यात आले होते. या ठिकाणी डॉक्टर व संपूर्ण स्टॉपने परिश्रम घेऊन तिची सुरक्षित प्रसूती केली. २६ बोटे असलेल्या या बालकास पाहून सर्वच अवाक झाले. येथे ग्रामीण रुग्णालय आहे. या ग्रामीण रुग्णालयांमध्ये शनिवारी पहाटे पूर्वी ज्योती नंदू नवाल बारेला (वय २०) राहणार झिरण्या ता. जिरण्या जिल्हा खरगोन (मध्य प्रदेश ) या गरोदर मातेला प्रसूती वेदना होत असताना तीन वाजेच्या सुमारास दाखल.
करण्यात आले. मध्यरात्रीनंतर दाखल झालेले या महिलेची तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कौस्तुभ तळले, अधिपरिचारिका कोमल आदीवाले, सुमित बोरसे, सरला परदेशी यांनी मध्ये मध्यरात्री तीन वाजून ३२ मिनिटांनी या गरोदर मातेचे सुरक्षित प्रस्तुती केली.दरम्यान या मातीने ज्या बाळाला जन्म दिला त्याला एकूण २६ बोटे होती हे पाहून सर्वच आवाक झाले. सद्या माता व बालक या दोघांचे प्रकृती ठणठणीत आहेत. तर या बालकाला पाहण्यासाठी अनेकांनी रुग्णालयात गर्दी देखील केली होती.
नवजात बालकाला असे आहेत सव्वीस बोटे या नवजात बालकाला दोन्ही हाताला प्रत्येकी सहा सहा अशी बाराबोटे आहेत तर दोन्ही पायांच्या प्रत्येकी सात सात असे १४असे आता पाहायला मिळून एकूण २६ बोटे आहेत