आज पुन्हा मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षा नजमा तडवी कारभार स्वीकारणार

भुसावळ प्रतिनिधी दि 31 मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षा पदी पुन्हा नजमा तडवी कारभार स्वीकारणार...

मुक्ताईनगरात जल्लोष करण्याचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांचे आवाहन दि. 31 जुलै रोजी सकाळी 10 वाजता मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षा पदी पुन्हा नजमा तडवी आ. गिरीशभाऊ महाजन, आ.मंगेश चव्हाण, खा.रक्षाताई खडसे, आ. संजय सावकारे, डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, नंदूभाऊ महाजन यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कारभार स्वीकारणार आहेत.

सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगर येथे येवून नगराध्यक्षा नजमा तडवी यांना शुभेच्छा द्याव्यात व जल्लोष साजरा करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी केले आहे.