वाघुर धरणाला संत तोता राम महाराजांचे नाव द्या –शिशिर जावळे
उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री फडवणीसांकडे मागणी
भुसावळ|
खानदेशातील वैकुंठवासी हरिभक्त परायण संत श्रेष्ठ परमपूज्य तोताराम महाराज गाडेगाव कर यांनी वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारासाठी स्वतःच्या संपत्तीचा ऐश्वर्याचा त्याग करून वैष्णव पांथासाठी स्वतःच संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांनी केलेले कार्य हे शब्दात प्रकट केले जाऊ शकत नाही . त्यांनी संपूर्ण खानदेशामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करून घराघरांमध्ये वारकरी संप्रदाय पोहोचविला.अशा या थोर संतांच्या प्रति आदरभाव व्यक्त करणे व त्यांचे कार्य अखंड मानवत जातीला समजावून देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे म्हणून महाराजांच्या प्रति मानसन्मान व आदरभाव व्यक्त करण्यासाठी या थोर संताचे नाव(वै.ह. भ. प. संत श्रेष्ठ तोताराम महाराज गा डेगावकर धरण)आपल्या जामनेर तालुका जिल्हा जळगाव महाराष्ट्रातील वाघुर धरणास देऊन संपूर्ण वारकरी संप्रदायास व लेवा समाजास उपकृत करावे.