शेतकर्‍यांच्या लेकींना नानाची मदत

0

मुंबई । अभिनेता नाना पाटेकरने आता गरीब शेतकर्‍यांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत केली आहे. ‘नाम’ फाऊंडेशनच्या माध्यमातून धर्मादाय आयुक्तांकडे त्याने 17 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे.

गरीब शेतकर्‍यांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन याच वर्षी मार्चमध्ये धर्मादाय आयुक्तांनी विविध संस्थांना केले होते. या आवाहनाला नानाने प्रतिसाद दिला आहे. धर्मादाय आयुक्त शिवकुमार दिघे यांनी सांगितले की, ’नाना पाटेकरने शनिवारी आमच्याकडे 17 लाख रुपयांचा धनादेश सोपवला आहे. मराठवाडा, आणि विदर्भासहित राज्यातील गरीब शेतकर्‍यांच्या मुलींच्या विवाहासाठी तो पैसा खर्च केला जाईल.’ गेल्या पंधरा-वीस दिवसांत 1 हजारांहून अधिक सामूहिक विवाह पार पडले आहेत. आगामी काही दिवसांत दोन हजारांचे लक्ष्य पार करू, असेही दिघे यांनी सांगितले. नाना पाटेकरच्या नाम फाऊंडेशनचे आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबासाठी याआधीपासून काम चालूच आहे.