मुंबई- सध्या #Me Too चळवळमुळे बॉलीवूड चर्चेचा विषय झाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तवणूक केल्याचे आरोप केले आहे. त्यानंतर एका पाठोपाठ एक प्रकरणे समोर येत आहे. दरम्यान तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी केली आहे. नाना पाटेकर यांच्यासह गणेश आचार्य, समी सिद्दीकी आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांची देखील नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. २००८ मध्ये ‘हॉर्न ओक प्लीज’ या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ता यांच्याशी असभ्य वर्तवणूक केल्याचे आरोप होत आहे.