नंदूरबार: काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नंदुरबार लोकसभा मतदार संघात भाजपचे विद्यमान खासदार डॉ. हिना गावित आणि काँग्रेसच्या अॅड. के.सी. पाडवी यांच्यात मुख्य लढत होत आहे. यात कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. कॉंग्रेसचे के.सी.पडावी हे सुरुवातीपासून आघाडीवर होते. ते जवळपास १० हजार मतांनी आघाडीवर होते. मात्र आता त्यांची आघाडी आता तुटली असून ते आता भाजपच्या उमेदवार हीना गावित ५ हजारपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत.