नंदुरबार: तालुक्यातील ठाणेपाडा येथील वनविभागाच्या जंगलात अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीने रौद्ररूप धारण केले आहे. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रत्यत्न करावे लागले. ठाणेपाडा वनक्षेत्रात वन्यजीव प्राण्यांचा अधिवास आहे. त्यामुळे या आगीत वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा पोहचला असून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. आगीत हजारो वृक्ष जळून खाक झाली आहेत, नेमकी ही आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही.