नंदुरबारमध्ये ६ वाजेपर्यंत ६८.९ टक्के मतदान !

0

नंदुरबार: लोकसभा निवडणुकीसाठी नंदुरबार जिल्ह्यात कमालीचा उत्साह दिसून आला. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ६८.९ टक्के मतदान झाले होते. उन्हाची दाहकता असतांना देखील मतदारांनी उन्हाची परवा न करता मोठ्या संख्येने मतदान केले. नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. त्यामुळे या ठिकाणी झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून कौतुक होत आहे. नंदुरबार जिल्हा हा चौथ्या टप्प्यात झालेल्या मतदानात महाराष्ट्रात पहिल्या स्थानी आहे. सायंकाळी ६ वाजता मतदानाची शेवटची मुदत होती. ६ वाजेनंतर देखील मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहेत. सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. सकाळी 11 वाजेपर्यंत 24.५९ टक्के मतदान झाले होते. आता दुपारी 1 वाजेपर्यंत 28.11 टक्के मतदान झाले आहे. आता दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानात नंदुरबार जिल्ह्यात 49.51 टक्के मतदान झाले आहे. आज होत असलेल्या मतदानात नंदुरबार जिल्हा राज्यात पहिल्या स्थानी आहे.

मतदान केंद्रावर सखी मतदान केंद्रातर्फे मतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले जात होते.

जागृत मतदार बाहेर पडल्याने 9 वाजेपर्यंत 8 टक्के मतदान झाले. दरम्यान बोहल्यावर चढण्यास आधीच तळोदा तालुक्यातील दलेलपुर येथील दिव्या वसंत पाडवी या वधूने तसेच शिरपूर तालुक्यातील वाडी येथील राजू भिवा भिल या वराने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सध्या उन्हाचा पारा 44 अंशापर्यंत असल्याने अनेक मतदारांनी सकाळीच घराबाहेर पडून मतदान करणे पसंत केले.