नंदुरबार-डॉ राजकुमार निर्मित व डॉ सुजित पाटील दिग्दर्शित “बटरफ्लाय’या हिंदी लघूचित्रपटाला अमेरिकेतील न्यू जर्सी येथे पार पडलेल्या “स्टूडंट वर्ल्ड इम्पॅक्ट फिल्म फेस्टीवल’मध्ये बेस्ट फिल्मचा अॅवार्ड घोषीत झाला.१२० देशांच्या १३ हजार ८६८ चित्रपटातांनी या फेस्टीवलमध्ये सहभाग नोंदवला असून त्यात बटरफ्लायची बेस्ट लघूचित्रपट म्हणून निवड झाली आहे. २५ जून रोजी एका भव्य सोहळयात पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
नंदुरबारच्या कलावंतांनी बनवलेल्या या हिंदी लघूचित्रपटाने दक्षिण कोरीयासह भारतात ५७ अॅवार्ड मिळवले आहेत. हा सिनेमा प्रेक्षकांसह आता परिक्षकांच्या नजरेतही पसंतीस उतरला असून अमेरिकेत पुरस्कार मिळवणारा हा खानदेशातील पहिलाच चित्रपट ठरला आहे.
सारझन शेट्टी,डाॅ विशाल पाटील, मानसिंग राजपूत या तिघांनी उत्तम अशी सिनेमाऑटोग्रफी केली असून सुंदर चित्रिकरणामुळे चित्रपट देखणा झाला आहे. रणजित राजपूत, डॉ राजकुमार पाटील,प्रशंसा तवर, कामिनी भोपे,डॉ जयंत शाह,दिपक पटेल, संदीप सुर्यवंशी, डॉ रोहन शाह, डॉ राजेश कोळी, हितल ठाकरे, नागसेन पेंढारकर,डाॅ अनिकेत गोटे, दिलीप सोनार, नंदा सोनार, पुनम भावसार,डाॅ वृशाली पाटील,डॉ स्वप्नील जैन, मनोज पिंपळे, जैनी जयेश,डॉ प्रशांत ठाकरे, नरेश शाह,रविंद्र पोतदार आदींनी महत्वाच्या भुमिका वठवल्या आहेत. साऊंड अमित त्रिवेदी, प्रोडयूसर डिझायनर रूचिता पाटील, मिक्सिंग प्रशांत झोरे,संगितकार केयुर भगत, प्रियंका भगत,तसेच रूषभ पुणेकर, महेश बोलायकर, शिवाजी महाजन आदींनी चित्रपटाच्या सर्वांगिंन बाजूने कामे केली आहेत.
आता पर्यंत देशभरात ५७ अवार्डने सन्मानित बटरफ्लाय या चित्रपटाने १३ हजार ८६७ चित्रपटांमध्ये आधी नामांकन तसेच त्यानंतर बेस्ट लघू चित्रपटाचा अवार्ड घोषित झाल्याने नंदुरबारसह खानदेशासह महाराष्ट्राचा सन्मान झाला आहे. जगभरातून १२० देशातील चित्रपटातील निवड झाल्याने दिग्दर्शक डॉ सुजित पाटील यांचे कौतूक होत आहे.
परिक्षकांनी या चित्रपटाबद्दल खूप कौतूक केले आहे. अमेरिकेतील इंग्र्रजी भाषिक परिक्षकांनाही हा सिनेमा भावल्याने निर्माते डॉ राजकुमार पाटील यांनी आनंद व्यकत केला आहे.
नंदुरबार शहरात या पुढे चित्रपटाची ही परंपरा अशीच सुरू रहावी,यासाठी शहरातील कलावंतांना घेऊन अशाच पध्दतीची कलाकृती निर्माण करू,असा विश्वास डॉ सुजित पाटील यांनी व्यक्त केला आहे.
महेंद्र पब्लिक स्कूल,पिनल शाह, निलेश तवर यांनी या चित्रपटाच्या सहाय्यक निर्माते म्हणून काम पाहिले आहे