अनिकेत तटकरेंना एकतर्फी निवडुन आणू – नारायण राणे

0

सिंधुदुर्ग – कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठींबा जाहीर केला असुन त्यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन आज ओरसगाव येथील पक्षाच्या मेळाव्यात केले आहे.

यावेळी रा.कॉ.पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, आमदार नितेश राणे, कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रा.कॉ.आघाडीचे उमेदवार अनिकेत तटकरे , दत्ता सामंत, रेश्मा सावंत सर्व नगरसेवक, जि.प.सदस्य, पं.स.सभापती, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेनेला टोला

खासदार  नारायण राणे यांनी आपल्या मनोगतात रा.कॉ.चे उमेदवार यांना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा पाठींबा असुन कोकणातुन शिवसेनेचा एकही उमेदवार कदापी निवडुन येवु देणार नाही. अनिकेत तटकरे यांचा एकतर्फी विजय निश्चित आहे. विरोधकांनी केवळ त्यांना पडलेली मते मोजत राहावी असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

पाठिंबा मिळाल्याने आभार

सरचिटणीस आ.सुनील तटकरे यांनी स्वाभिमान पक्षाच्या पाठींबा मिळाल्याचा आनंद असुन त्यांचे आभार मानले स्वाभिमानी पक्षाने दिलेल्या पाठींब्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. मागील तिन्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत राणेंच्या सहकार्यांने रा.कॉ.पक्षाचा उमेदवार निवडुन आणण्यासाठी मदत मिळाली होती यंदा ही विजय आमचाच असेल. नारायण राणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे केंद्र बिंदु आहेत, भविष्यातील राजकीय दिशांची नांदी केंद्र बिंदुपासुन निर्माण होत असते, असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर तटकरे यांनी सांगितले.