पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला अहिराणीतून संवाद
धुळे । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खान्देशवासियांशी चक्क अहिराणीतून संवाद साधत सभेला उपस्थित झालेल्या हजारो नागरिकांची मने जिंकली.
उधना-पाळधी रेल्वेच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी खान्देशातील नागरिकांशी अस्सल अहिराणी भाषेतून संवाद साधला. ते म्हणाले की, ‘आठे जमेल तमाम खान्देशना भाऊ-बहिनीसले मना मनपूर्वक नमस्कार…. इतला लोके माले आशीर्वाद देवाले उनात…म्हनुसनी मी तुम्हना आभारी शे…..आठेना लोकेसना जिव्हाळ्याना प्रकल्पाकरता मी सभा घी र्हायनू..!’ असा संवाद साधताच सभेला उपस्थित असलेल्या हजारो खान्देशवासियांनी हात उंचावून मोदींना प्रतिसाद दिला. मोदींनी अस्सल अहिराणीतून साधलेल्या या संवादाची राजकीय वर्तुळासह खान्देशात मोठी चर्चा रंगली होती.