नवी दिल्ली: १७ व्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवीत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहे. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी ३० में रोजी होणार आहे. यावेळी मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळ देखील शपथ घेणार आहे. ३० रोजी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा होणार आहे.