नवी दिल्ली: २०१९ च्या १७ व्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले असून, १६ वी लोकसभा काल विसर्जित करण्यात आली आहे. नवीन मंत्रीमंडळाचा शपथ विधीपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हेच काम पाहणार आहे. काल नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन आपला राजीनामा सोपवला. आज सायंकाळी नरेन्द्र मोदी हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याचे वृत्त आले आहे, पण या बातमीला अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १६ वी लोकसभा भंग केली आहे. १७व्या लोकसभा स्थापन करण्याची तयारी सुरु झाली असून, मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोरा यांच्या तीन सदस्यीय पथकाने राष्ट्रपती यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ५४२ नवीन सदस्यांची यादी सुपूर्द केली आहे. १६व्या लोकसभेचा कार्यकाळ येत्या ३जुन रोजी संपणार आहे.
मोदी यांच्या मंत्रीमंडळात कुठल्या चेहऱ्यांना संधी मिळते हे पाहणे औस्तुक्याचे ठरेल. तसेच नवीन मंत्रीमंडळात किती मंत्री राहतील हे निश्चित नसून त्या विषयी लवकरच भाजपाच्या नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे असे वृत्त येत आहे.