नवी दिल्ली: बॉलीवूड मधील खिलाडी ओळख असलेल्या अक्षय कुमारच्या आगामी चित्रपट असणाऱ्या ‘मिशन मंगल’ या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाहुण्या कलाकारात दिसणार असल्याच्या चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. मात्र याबाबत खुद्द अक्षय कुमारने या बाबत मौन बाळगले आहे. मिशन मंगल या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी यांचा समावेश आहे.
‘
मिशन मंगल’ हा सिनेमा मंगळ ग्रहावर अवकाशयान पाठवण्याचा प्रयत्न, आणि जिद्दीवर आधारित आहे. राकेश धवन,आणि तारा शिंदे यांच्या मंगळग्रहावर सॅटेलाईट पाठवण्यात महत्वाची भूमिका होती. त्यांच्या या भूमिकेवर चीत्रपटाची कथा आहे. या चित्रपटात नरेंद्र मोदी पाहुणे कलाकाराच्या भूमिकेत दिसणार या विषयी विचारले असता’ ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेऊ नका, जेव्हा मोदी येतील तेव्हा मीच स्व:ताहून सांगेल असे अक्षय ने उत्तर दिले आहे.
Prev Post