कैलास मानसरोवर यात्रेसाठी नथुला पास खुले

0

नवी दिल्ली-कैलाश मानसरोवर यात्रेसाठी नथुला पास उघडण्यात आला आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी जाहीर केले. केंद्रीय मंत्री स्वराज यांनी सांगितले आहे की मी चीनी परराष्ट्र मंत्रालयाला सांगितले होते की, गेल्या यात्रेदरम्यान नाथुला पास बंद झाल्यामुळे सरकारांमधील संबंध खराब झाले होते. ते सुधारण्यासाठी नथुला पास उघडणे आवश्यक आहे. आता यात्रेसाठी उघडण्यात आले आहे. सुमारे 1580 यात्रेकरू कैलाश मानसरोवर यात्रेला यावर्षी जाणार आहे. नाथुला मार्ग 2015 मध्ये भारतीय यात्रेकरूंना खुले करण्यात आले. नाथुला पास ओलांडल्यावर भारतीय यात्रेकरूंना चीनी परिवहन कॅलाशकडे नेले जाते.