पुणे- वर्षभरात एका वित्तीय वर्षात विविध राष्ट्रीय दिनी चार ग्रामसभा घेण्यात येतात. मात्र ऐनवेळी जिल्हा परिषदेकडून विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश दिले जातात. त्यामुळे वर्षभरातील ग्रामसभेची संख्या वाढली आहे. प्राधान्य क्रमाच्या योजनांबाबत देखील राष्ट्रीय दिनी विशेष कार्यक्रम घेण्यात येत असल्याने या वित्तीय वर्षापासून राष्ट्रीय दिनी ग्रामसभा न घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
आता या वित्तीय वर्षापासून मे, ऑगस्ट, नोव्हेंबर, २६ जानेवारी या दिवशीच ग्रामसभा होणार आहे. या अगोदर १ मे, १५ ऑगस्ट, २ ऑक्टोंबर, २६ जानेवारी या चार दिवशी ग्रामसभा घेण्यात येत होती. यापुढे या दिवशी ग्रामसभा होणार नाही. शासनाने तसे परिपत्रक काढले आहे.
राष्ट्रीय दिनी ग्रामसभा न घेण्याचा निर्णय अनाकलनीय आणि निषेधार्ह आहे. ज्या गांधीजींनी गावे समृद्ध आणि सक्षम करण्याचा विचार या देशाला दिला त्या गांधीजींच्या जयंती दिनी आयोजित केली जाणारी ग्रामसभा का रद्द करण्यात आली. गांधी विचारांना संपवण्याचा हा डाव आहे असे आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. ट्वीटर खात्याद्वारे त्यांनी शासनाचा निषेध व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय दिनी ग्रामसभा न घेण्याचा निर्णय अनाकलनीय आणि निषेधार्ह आहे. ज्या गांधीजींनी गावे समृद्ध आणि सक्षम करण्याचा विचार या देशाला दिला त्या गांधीजींच्या जयंती दिनी आयोजित केली जाणारी ग्रामसभा का रद्द करण्यात आली. गांधी विचारांना संपवण्याचा हा डाव आहे. सरकारचा जाहीर निषेध ! pic.twitter.com/iJBVrThfpe
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 27, 2018