शहर वाहतूक शाखेचा नहीला पत्रव्यवहार ; शहर वाहतूक शाखेने दिलेल्या पत्रांनंतरही दुरुस्तीकडे दुर्लक्ष ; वर्षभरात शहरातील महामार्गावर अपघातात 54 जणांचा मृत्यू
किशोर पाटील
जळगाव- महामार्गावरील अपघातांंमध्ये बळींची संख्या चिंताजनक आहे. उपाययोजना होत नसल्याने दिवसेंदिवेस ही बळी जाणार्यांची आकडेवारी वाढत आहेत. जानेवारी 2018 ते 2019 या वर्षभरात 54 जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने शहर वाहतूक शाखेने सर्वोच्च न्यायालयांच्या निर्देशान्वये महामार्गावर अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यामुळे होणार्या कायदा व सुव्यवस्थेला जबाबदार धरुन थेट राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील येतील अशा आशयाचे पत्र पाठविले आहे.
शहरातील महामार्ग दुरुस्ती, समांतर रस्ते तसेच चौपदरीकरणासाठी विविध संघटनांतर्फे आदांलने करण्यात येवून जाब विचारण्यात आला. प्रशासकीय यंत्रणेने आश्वासनांचा पाऊस पाडत अद्यापर्यंत ना चौपदरीकरण झाले ना समांतर रस्ते त्यामुळे दिवसेंदिवेस महामार्गावर बळी जाणार्यांची एकीकडे वाढत आहे, मात्र प्रशासनाला त्याचे कुठलेही सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे.
’नही’कडून वाहतूक शाखेच्या पत्रांंना केराची टोपली
अनेकदा अपघातात एकाद्याचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांकडून जमावाकडून तसेच समाजबांधवांकडून वाहनांची जाळपोळ, अपघातास कारणीभूत चालकाला मारहाण, रास्तारोको, मृतदेह ताब्यात न घेणे अशा प्रकारे कायदा व सुवव्यवस्थेस बाधा ठरणार्या घटना घडतात. यामुळे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक देविदास कुनगर यांनी वारंवार रस्ते दुरुस्ती तसेच महामार्गावरील उपाययोजनांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणला (नही) पत्रव्यवहार केला. तब्बल 50 पेक्षा जास्त वेळा पत्र पाठविल्याचेही खुद्द देविदास कुनगर यांनी जनशक्तीशी बोलताना सांगितले. मात्र यानंतरही कुठलीही दुरुस्ती करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
शहर वाहतूक शाखेने पाहणी करुन सुचविली दुरुस्तीची ठिकाणे
अपघातानंतर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक देविदास कुनगर यांनी खोटेनगर ते कालिंकामाता मंदिर चौकादरम्यान महामार्गाची पाहणी केली होती. शिवकॉलनीसह ठिकठिकाणी साईटपट्टया खोल, महामार्गावर खड्डे दिसून आले. खड्डा चुकविताना तसेच साईटपट्टयामुळे वाहन न खाली न उरतविल्याने अपघात होत असल्याचे कुनगर यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी संबंधित ठिकाणांचा स्पष्ट उल्लेख करुन दुरुस्ती करण्याबाबत नहीला पत्रव्यवहार केला. मात्र यानंतरही विभागाकडून कुठलीही दुरुस्ती अथवा उपयायोजना करण्यात आल्या नाहीत.
वर्षभरात शहरात 40 अपघातात 46 जणांचा मृत्यू
जळगाव उपविभागात रामानंदनगर, तालुका पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, एमआयडीसी पोलीस स्टेशन तसेच शनिपेठ पोलीस स्टेशन या सहा पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. शहर वाहतूक शाखेच्या या कार्यक्षेत्रात महामार्गावर जानेवारी ते डिसेंबर 2018 या काळात 40 अपघातांमध्ये 46 मयत झाले तर 59 अपघातांमध्ये 91 गंभीर तर 59 किरकोळ जखमी झाले आहेत.
अवघ्या दोन महिन्यात 8 जणांचा बळी
जळगाव उपविभागात 2019 या नवीन वर्षाची सुरुवातही अपघातांच्या घटनांनी झाली. जानेवारी महिन्यात महामार्गावर अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 3 गंभीर तर 5 किरकोळ जखमी झाले. तर फेब्रुवारी महिन्यात 3 जणांचा मृत्यू, 7 गंभीर व 3 किरकोळ गंभीर झाले आहेत. अशाप्रकारे दोन महिन्यात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यानुसार गेल्या काही वर्षांमध्ये हजारोंचा बळी या महामार्गाने घेतला असताना दगडाचे काळीज असलेल्या प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच दिली जात असून कुठलीही उपापयोजना करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे अपघातांमध्ये मृत पावणार्यांमध्ये तरुणाची संख्या चिंताजनक आहे.
16 मार्चला महामार्गावर झाला रास्तारोको
शहरातील सालारनगर येथील घरुन अॅस्टर होंडाच्या शोरुममध्ये आपल्या कामावर जात असलेल्या पादचारी विक्री प्रतिनिधी गुफरान खान अजमल खान वय 24 रा. सालानगर याला ट्रकने उडविल्याची घटना शुक्रवारी महामार्गावरील मानस हॉटेलजवळ 16 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडली. तरुणाचा जागीच मृत्यू झाल्यानंतर संतप्त जमावाने ट्रकचालक व क्लिनरला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान महामार्गावरील अपघातांची सुरु असून कुठलीही उपाययोजना होत असल्याने नागरिकांनी अजिंठा चौकात रास्तारोको आंदोलन करत संताप व्यक्त केला. यामुळे सुमारे 1 एक तास चहू बाजूंनी वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या अभियंत्याने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर तब्बल दोन तासानंतर वाहतूक सुरळीत झाली होती.
आता थेट नहीच्या अधिकार्यांवर गुन्हे
नहीला जबाबदार धरुन अजिंठा चौकातील रास्तारोकोमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये तसेच सुप्रिम कोर्टाच्या जारी केलेल्या निर्देशानुसार यापुढे अपघातात महामार्गावर कुणाचा मृत्यू झाल्यास व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणला जबाबदार धरुन संबंधित अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. तशा आशयाचे पत्र पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाला पाठविले आहे.- देवीदास कुनगर, पोलीस निरिक्षक, शहर वाहतूक शाखा
महिनाभरात चौपदरीकरणाला सुरुवात
महिनाभरात चौपदरीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. शहर वाहतूक शाखेने पाठविलेले पत्र मिळाले आहे. मात्र ते बघितलेले नाही. ते पत्र बघितल्यानंतर पत्राला अनुसुरुन उत्तर पाठविण्यात येईल.- चंद्रकांत सिन्हा, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण