पश्चिम बंगालमधील तृणमुल काँग्रेस या दोन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द

लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि पश्चिम बंगालमधील तृणमुल काँग्रेस या दोन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

सार्वत्रिक निवडणुकांमधील सुमार कामगिरी लक्षात घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी संध्याकाळी याबाबतची घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधी पक्षांची एकजूट बांधण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा रद्द झाल्याने राष्ट्रीय राजकारणात त्यांच्यासाठी हा निर्णय मोठा धक्का मानला जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमुल काँग्रेस आणि भाकप या पक्षांची ओळख आता प्रादेशिक पक्ष म्हणून राहणार आहे.