‘राष्ट्रवादीची भाजपबरोबर बोलणी सुरू’; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत किती दिवस राहील ते माहीत नाही. भाजपबरोबर त्यांची बोलणी सुरू असलायाचा गौप्यस्फोट काँग्रेसचा ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेसचा विजय निश्चित आहे. काँग्रेसच्या मतांची विभागणीकरण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपकडून जेडीएसला मदत केली जात आहे. त्यातच काँग्रेसचा सहयोगी राष्ट्रवादीनेही कर्नाटकात काँग्रेसविरोधात उमेदवार उभे केले आहेत.

राष्ट्रवादी अजून तरी आमच्यासोबत आहेत. परंतु आणखी किती दिवस आमच्यासोबत राहतील हे माहिती नाही. कारण भाजपासोबत त्यांची रोज बोलणी सुरू आहे. कोण नेता येणार, कोण जाणार याच्या सतत बातम्या येत आहेत. त्यांनी काय तो निर्णय एकदा घ्यावा, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.