भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
विविध स्पर्धेतील विजेतांचा गौरव : उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीएलओंचा सत्कार
भुसावळ, दि.२६, प्रतिनिधी – येथील तहसील कार्यालय आणि भोळे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने चौदाव्या राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, नायब तहसीलदार अंगद आसटकर, गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोळे आणि भुसावळ नगरपरिषदेचे उप मुख्याधिकारी लोकेश ढाके आदी प्रमुख पाहुणे म्हणून तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक हे अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रा.डाॅ.दयाघन राणे यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाची पार्श्वभूमी सांगितली. नायब तहसीलदार अंगद आसटकर यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने तहसील कार्यालयाने मतदान जनजागृतीसाठी निवडणूक विभाग करीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत प्रास्ताविक केले.
कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. सोबतच उत्कृष्ठ कार्य केलेल्या बीएलओ आणि मतदार जनजागृती मध्ये विशेष कार्य केलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी मतदानाचे महत्व विशद केले. विद्यार्थ्यानी समाजाचा अभ्यास करीत असताना आपल्या देशसोबतच इतर देशांचा अभ्यास करावा. कारण, आपली जशी मानसिकता असते तसे सरकार आपल्याला मिळत असते म्हणून अभ्यास आणि मतदान हे महत्वाचे आहे. त्याच बरोबर उत्कृष्ठ नागरिक बनण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यांचा स्वीकार करा आणि उत्कृष्ठ नागरिक बनावे असे आवाहन पाटील यांनी केले.
विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांपैकी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालेल्या विद्यार्थिनी कु. प्रेरणा खगेन्द्र चौधरी हिने मनोगत आणि स्पर्धेसाठी दिलेले भाषण सादर केले. तर तृतीय पंथी मतदार चांद तडवीने ही आपले प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करताना तृतीय पंथियांना जगताना किती संघर्ष करावा लागतो हे सांगून तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी मतदार ओळखपत्र तयार करून देवून आमचा पुनर्जन्म घडवून आणला असे मत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अत्यंत पवित्र आणि मूलभूत अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे असे मत व्यक्त करून सुयोग्य व्यक्तीला केलेले मतदान हे आपले आणि देशाचे भविष्य बदलवयला सक्षम असते, म्हणून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे असे आवाहन केले.
कार्यक्रमात विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. गौरविण्यात आलेल्यांची नावे अशी,
निबंध स्पर्धा
मेघा संजय सपकाळे ( प्रथम),
प्रांतिका सतीश हंसकर (द्वितीय),
वंशिका कुंदन पाटील (तृतीय),
घोषवाक्य लेखन स्पर्धा
भावेश सुनील छाबडीया (प्रथम),
रेवती मंगेश भारंबे (द्वितीय),
वैष्णवी सुकलाल कोळी (तृतीय)
चित्रकला स्पर्धा
भावेश विनोद अढळकर (प्रथम),
कुलदीप रवींद्र पाटील (द्वितीय)
रागिणी प्रमोद चौधरी (तृतीय)
वक्तृत्व स्पर्धेत
प्रेरणा खगेन्द्र चौधरी (प्रथम),
मोहिनी तुषार पाटील (द्वितीय)
हिमेश दीपक बनसोडे (तृतीय)
उत्कृष्ठ कार्य केलेल्या बीएलओंमध्ये रितुराज चंद्रकांत चौधरी, विद्या गोपाळ पाटील, हमिद उल्ला शफी उल्ला खान, किसन रामदास पाटील, प्रदीप राजाराम सपकाळे यांचा तर तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखेतील सचिन अरुण पाटील, दिपक माळी, महेश सपकाळे, श्याम गिरी, पुष्कराज पाटील व असलम शेख यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांमधील मतदार जनजागृती मध्ये उत्तम कार्य केल्या बद्दल डी.एल.हिंदी हायस्कूलचे प्राचार्य मनोजकुमार माहेश्वरी यांचा आणि श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा.वाय.डी.देसले सरांचा सत्कार करण्यात आला.
दिव्यांगांमध्ये मतदान जनजागृती केल्या बद्दल दिव्यांग सेवा फाऊंडेशनचे शेख अकबर शेख अहमद आणि दीव्यांग शहर विकास आघाडी वरणगाव यांचा ही सत्कार करण्यात आला.
एप्रिल २०२४ मध्ये पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी सज्ज झालेल्या नव मतदार मृणाली पाटील, सुमेध रंधे, आणि रोहन चंदन, ज्येष्ठ मतदार दशरथ चौधरी, विमलबाई काकडे, डिव्यांग मतदार मोहम्मद सिद्दिक शाह, व शेख अकबर, शेख अहमद, तृतीयपंथी मतदार चांद तडवी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ठ कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांचाही सत्कार करण्यात आला.
उपस्थितांचे स्वागत प्राचार्य डॉ.आर.पी.फालक, प्रा.डॉ.संजय चौधरी व प्रा.डॉ.आर.बी.ढाके यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.डॉ.दयाघन राणे यांनी तर आभार नायब तहसीलदार अंगद आसटकर यांनी मानले.