ओडिशा: ओडीशाच्या मुख्ममंत्रीपदी पुन्हा एकदा नवीन पटनायक विराजमान झाले असुन, सलग ते पाचव्यांदा मुख्यमंत्री झाले आहे. भुवनेश्वरमधील एक्झिबिशन ग्राउंडमध्ये नवीन पटनायक यांचा शपथविधी सोहळा झाला. त्यांच्यासोबत २१ मंत्र्यांनी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरद्वारे नवीन पटनायक यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ओडिशामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका सोबतच झाल्या होत्या. ओडिशा विधानसभेमध्ये एकूण १४६ सदस्य आहे. त्यापैकी नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाने ११२ जागा जिंकत आपला किल्ला शाबूत ठेवला आहे. सलग ओडिशामध्ये पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदी बसण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांच्या मंत्रीमंडळात एकूण २१ मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये ११ कॅबिनेट मंत्री आणि ९ राज्यमंत्री आहेत.
फोनी चक्रीवादळाने तडाखा दिल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ओडिशाची हवाई पाहणी करत, ओडिशाला तातडीने मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्या बदल्यात नवीन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते.