नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच

मुंबई हायकोर्टात जामिनाबाबत निर्णय शक्य

मुंबई ।

माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. नवाब मलिक यांनी जामीन मिळावा म्हणून सर्वो उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र या प्रकरणात आधी बॉम्बे हायकोर्ट सुनावणी करणार आहे, ते न्यायालय काय निर्णय घेणार त्याची वाट पाहा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. नवाब मलिक यांनी प्रकृती अस्वस्थ असल्याचं कारण देत जामीन मिळावा म्हणून नवाब मलिक यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र त्यांना कुठलाही दिलासा कोर्टाने दिलेला नाही,

नवाब मलिक यांनी याचिकेत काय म्हटलं आहे ? » राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आरोग्याचं कारण देत सर्वोच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल केली. माझी एक किडनी खराब आहे. तसंच दुसरी किडनीही कमी प्रमाणात कार्यरत आहे. एक तपासणीची संमती घेण्यासाठी न्यायालय दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी घेतं. त्यामुळे मला जामीन मिळावा असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र सर्वो न्यायालयाने त्यांना दिलासा दिलेला नाही. जस्टिस संजीव खन्ना आणि जस्टिस एमएम सुंदरेश यांच्या पीठाने याविषयीचा निर्णय दिला आहे. मलिक यांच्या वतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारल्याने सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली.