शोध मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात; ११ जवान जखमी

0

झारखंड: आज सकाळी पाचच्या सुमारास झारखंड पोलीस आणि कोब्रा फोर्स यांच्या सयुंक्त पथकाने विशेष शोध मोहीम राबवली. या शोध मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात ११ जवान जखमी झाले आहे. हा स्फोट झारखंडमधील सरायकेला येथे झाला असून जखमी जवानांना हेलिकॉप्टरद्वारे रांची येथिल रुग्णालयात दाखल आले आहे.

झारखंड पोलीस आणि कोब्रा फोर्स यांच्या सयुंक्त पथकाने शोध मोहीम राबवली या दरम्यान नक्षलवादी यांनी आयईडीद्वारे स्फोट घडवून आणला. या स्फोटात झारखंड पोलीस दलातील ३ जवान, तर कोब्रा फोर्स मधील ८ जवान जखमी झाले आहे. गेल्या काही दिवसात नक्षलवादी कारवाया वाढल्या असून १ में रोजी नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात १५ जवान शहीद झाले होते, ९ एप्रिल रोजी केलेल्या हल्ल्यात एका आमदाराचा मृत्यू झाला आहे.