सायरस मिस्त्रीला एनसीएलटीकडून झटका

0

नवी दिल्ली-सायरस मिस्त्रीला टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून हटवण्यात आल्यानंतर वाद निर्माण झाला होता. या वादावर नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल एनसीएलटीने आपला निर्णय दिला. हा निर्णय सायरस मिस्त्रीसाठी मोठा झटका आहे. कारण एनसीएलटीने सायरस मिस्त्रीची याचिका फेटाळत टाटा सन्सच्या बाजूने निर्णय दिला आहे. सायरस मिस्त्रीने आपल्याला टाटा सन्सच्या चेअरमन पदावरून हटवण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात ही याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका फेटाळण्यात आली आहे.

सायरस मिस्त्रीने टाटा सन्सची गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने रतन टाटांवर लावण्यात आलेले सगळे आरोप फेटाळले आहे. टाटा समूहाच्या व्यवस्थापकिय मंडळात कोणतीही गडबड नाही. सायरस मिस्त्रीनी लावलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही ते आरोप निराधार आहेत असेही एनसीएलटीने म्हटले आहे.

सायरस मिस्त्रीने डिसेंबर २०१६ मध्ये एक याचिका दाखल करत टाटा ग्रुपच्या ऑपरेटिंग कंपन्यांमध्ये रतन टाटा आणि टाटा ट्रस्टचे एन. ए. सुनावाला यांचा हस्तक्षेप आहे. त्यामुळे टाटा सन्सचे व्यवस्थापकीय मंडळ कमकुवत झाले आहे. तसेच व्यवसायासंबंधी चुकीचे निर्णय घेतले जात आहेत असा आरोप केला होता. या संदर्भातली एक याचिकाच त्याने दाखल केली होती. टाटा सन्सच्या समूहात शापूरची पालोनजी यांना प्रतिनिधीत्त्व दिले गेल्याबद्दलही आक्षेप नोंदवला होता. तसेच टाटा सन्समध्ये ट्रस्टीजचा हस्तक्षेप नको असेही म्हटले होते. मात्र सायरस मिस्त्रीच्या या सगळ्या मागण्या फेटाळत त्याला झटका दिला आहे.