ईव्हीएमविरोधात राष्ट्रवादीची अर्ज भरणा मोहीम

0

मोहीमेच्या पहिल्याच दिवशी २६८२ अर्ज भरले

जळगाव – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ईव्हीएमविरोधात आजपासून अर्ज भरणा मोहीम सुरू करण्यात आली. आगामी निवडणूका ह्या मतपत्रिकेवर घेण्यासाठी ही मोहीम राबविली जाणार असुन शहरातील १ ते १९ प्रभागांमध्ये उद्या दि. १७ पासून या मोहीमेस सुरवात होणार आहे.
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मोहीमेस माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते नमुन्यातील अर्ज भरून सुरवात करण्यात आली. यावेळी मतदारांना जनजागृती करतांना माहिती देण्यात आली. पुढारलेल्या देशांमध्ये ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांचा स्विकार करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने आपल्या देशात देखिल मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्यासाठी शहरातील मतदारांकडुन नमुन्यातील अर्ज भरून ते आयोगाकडे जमा करण्यात येणार आहे.


२६८२ अर्जांचा भरणा
शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुरू झालेल्या या मोहीमेच्या पहिल्याच दिवशी २६८२ अर्ज भरण्यात आले. यावेळी अल्पसंख्यांकचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलीक, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख लिलाधर तायडे, कार्याध्यक्ष विलास पाटील, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन पाटील, माजी जि.प.सदस्य रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे माजी संचालक वाल्मीक पाटील, महिला शहराध्यक्षा नीला चौधरी, मंगला पाटील, धनराज माळी, मनीषा देशमुख, सरीता शिरसाठ, ममता तडवी, राजू मोरे, किरण राजपूत, भरत कर्डिले, पुरूषोत्तम चौधरी, अजय सोनवणे, रोहीदास पाटील, सुजित शिंदे, आर.डी.पाटील, खुशाल चव्हाण, सुनील पाटील, अनिरूध्द जाधव, नईम खाटीक, महेश सुर्यवंशी, आकाश साळुंखे, संजय चव्हाण, सुभाष माने, समीर शेख, अरविंद मानकरी, सागर पाटील, प्रसाद तायडे, पंकज पवार, शुभम तायडे, हरीश देशमुख, विकास मोरे, हर्षल तायडे, उज्ज्वल पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.