शरद पवार सोनिया गांधींच्या भेटीला !

0

नवी दिल्ली: विधानसभा निवडणूक अगदी महिन्याभारावर येऊन ठेपली आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवार देखील जाहीर झाले आहे. विधानसभेसाठी राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहे. शरद पवार सोनिया गांधींच्या निवासस्थानी पोहोचले आहे. त्याठिकाणी दोघांमध्ये चर्चा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या चर्चेसाठी ही भेट असल्याचे बोलले जात आहे. राज्यात सध्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून मोठ मोठे नेते बाहेर पडत आहे. त्याच बरोबर कॉंग्रेस सुस्थ अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे, याच पार्श्वभूमीवर आज सोनिया गांधी, शरद पवार यांच्यात चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.