पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील अदृश्य

0

राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पाटील यांची टिका

जळगाव – जिल्ह्यातील सर्वच १५ तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीला, पिण्याला व गुरांना पाणी मिळणे अवघड झाले आहे. तसेच चार्‍याचीही टंचाई आहे. जिल्ह्यात अशी भयावह परिस्थिती असतांना जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील मात्र, अदृश्य झाल्याचा टिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पाटील यांनी केली आहे. दरम्यान या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तालुकास्तरावर दुष्काळ परीषद घेण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत पुढे बोलतांना अ‍ॅड. रविंद्र पाटील यांनी पुढे सांगीतले की, भाजपाने सत्तेत येण्यपूवी शाश्वत शेतीचे आश्वासन दिले होते. त्याच्या योजना करणार असल्याचे सांगीतले होते. मोठे कुठलेच काम झाले नाही. जिल्ह्यात फेबु्रवारी महीन्याापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निमाण झाला आहे.सवच तालुक्यात टंचाईची परिस्थिती आहे. पिण्याला व शेतीला पाणी राहीलेले नाही. गुरांना चारा मिळणे देखिल अवघड झाले आहे. ही परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे. टँकर सुरु केले असले तरी ग्रामीण भागात लोडशेंडीग असल्याने टँकर भरता येत नसल्याची परिस्थिती असल्याचेही अ‍ॅड.पाटील यांनी सांगीतले. दुष्काळ निवारण्यासाठी शासनाने काहीच केले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. असे असतांना पालकमंत्री अदृश्य आहेत. शरद पवारांवर टीका करण्यापेक्षा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दु्ष्काळाच्या काळात त्यांची नैतिक जबाबादारी पार पाडावी, असा टोला त्यांनी लगावला. शेतकर्‍यांना कर्ज मिळण्याचा घोळ अद्याप मिटलेला नाही. यावेळी पाटील यांनी आगामी आठ दिवसात शासनाने प्रभावी उपाययोजना न राबविल्यास राष्य्रवादी काँगेसकडून तालुकास्तरावर आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यासह राष्ट्रवादी आगामी काळात तालुकास्तरावर दुष्काळ परिषद घेण्याचे नियोजन करीत असल्याचे अ‍ॅड. रविंद्र पाटील यांनी सांगीतले. यावेळी पत्रकार परीषदेला महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, महीला आघाडीच्या कल्पना पाटील,मंगला पाटील, परेश कोल्हे, सविता बोरसे व मिना पाटील आदी उपस्थित होते.