शिंदखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ – ग्रामपंचायत व नगरपंचायत निवडणुकीत लक्ष केंद्रित करा – माजी आमदार रामकृष्ण पाटील
शिंदखेडा (प्रतिनिधी) — येथील शिवाजी चौकात शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे व माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ह्या प्रसंगी माजी आमदार रामकृष्ण पाटील यांनी सांगितले की, शिंदखेडा तालुक्यात एकुण 23 ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत. सर्व ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुर्ण ताकदीने स्वबळावर लढणार असुन त्यावर मार्गदर्शन करताना ते म्हणाले. त्याचप्रमाणे शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत देखील निवडणुक लढवावी ह्या साठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्यावर निर्णय घेऊन कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. तालुक्यात पंचवीस हजार सभासद नोंदणी होतील असे आश्वासन दिले. शिंदखेडा तालुक्यात जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार व प्रसार होण्यासाठी प्रत्येक गावात जाऊन सभासद नोंदणी करण्यासाठी प्रयत्न केले जावेत असे आवाहन करत पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावेत असे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे यांनी केले. ह्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोतीलाल पाटील, जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे, जिल्हा युवक राष्ट्रवादी कार्याध्यक्ष निखील पाटील, ग्रंथालय सेल जिल्हाध्यक्ष दीपक जगताप, तालुका उपाध्यक्ष आनंदराव पाटील, शहराध्यक्ष प्रवीण पाटील, उप शहराध्यक्ष मिलिंद देसले, युवक शहराध्यक्ष गोलु देसले, युवक उपाध्यक्ष चेतन देसले, ग्रंथालय सेल तालुकाध्यक्ष हर्षदीप वेंदे, महेश सोनवणे, रहीम खाटीक, भैय्या मराठे, देविदास मोरे, अँड. निलेश देसले, हिमांशू पाटील, मनोज पाटोळे,जितु गुरव, योगेश पाटील,नरेश शिरसाठ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.