आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या वाहनाचा अपघात

0

जळगाव: जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे एकमेव आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या वाहनाचा पाळधीजवळ अपघात झाला. सुदैवाने ते या अपघातातून बचावले. आज सकाळी हा अपघात झाला. पाळधी चौफुलीवरून जात असतांना समोरून येणाऱ्या मोटारसायकल चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांची गाडी ही महामार्गाच्या खाली गेली. वीज तारांमध्ये ही गाडी अडकली. सुदैवाने वीजपुरवठा खंडीत झाल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी आमदार डॉ.सतीश पाटील वाहनात होते. ते सकाळी मुंबईहून परतले. रल्वे स्टेशनहून घरी जात असतांना हा अपघात झाला.

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत विचारपूस केली.