राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधन !

0

सोलापूर: माळशिरस तालुक्याचे आमदार हनुमंत डोळस यांना प्रकृती अत्यवस्थ्यामुळे मुंबईतल्या सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2014 साली माळशिरस या मतदारसंघातून विजयी झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईच्या चर्नी रोड परिसरातील सैफी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्यांनी आज सैफी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या माळशिरस मतदारसंघातून आमदार डोळस हे 2009 आणि 2014 मध्ये आमदार झाले होते.