जयंत पाटील राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष

0

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील मोती बाग या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर गुलटेकडी येथील पक्षाच्या सभेत शरद पवार नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा करण्यात आली. जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पसंती दिली असल्याचे समजते.  यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार  सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे नेते उपस्थित होते.