जळगाव l
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट होणार आहे. पंकजा मुंडे, त्यांच्या बहीण खासदार प्रीतम मुंडे यांच्यासोबत खडसे यांची भेट होणार आहे.
पंकजा यांनी नुकतेच मी भाजपची नाही तर भाजप पक्षात मी आहे. भाजप हा मोठा पक्ष आहे, असं वक्तव्य केलंय. याच वक्तव्यावर एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली,.
पंकजा मुंडे यांचे विधान दुःखद आणि वेदनादायी आहे. पंकजा मुंडे यांनी ज्या शब्दांमध्ये आपली उद्विग्नता व्यक्त केलीय ती अतिशय वेदनादायी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी पक्षासाठी उभं आयुष्य घातलं. पंकजा मुंडे यांची अशी अवस्था असणं म्हणजे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. असे खडसे म्हणाले.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव शहर महानगर प्रमुख अशोक लाडवंजारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, एकनाथराव खडसे हे पंकजा मुंडे यांची भेट घेण्यासाठी जळगावहून रवाना झाले आहेत. त्यांची बीड येथे भेट होणार आहे.
पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर एकनाथ
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या खडसे उद्या उपस्थित असणार आहेत. मात्र खडसे यांच्या भेटीमुळे मुंडे परिवार काही राजकीय धक्का देणार का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कारण मुंडे परिवार नाराज असल्याच्या चर्चा सध्या जोर धरू लागल्या आहेत.