भंडारा- भाजपातून नाराज झाल्यानंतर खासदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त असलेल्या पदावर पोटनिवडणूक होत आहे. ही जागा कॉंग्रेसने लढावी की राष्ट्रवादीने याबाबत वाद निर्माण झाला होता. राष्ट्रवादीने या जागेवर दावा करत आपला उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान ही जागा राष्ट्रवादीच लढणार आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील यास सहमती दर्शविली असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे.