राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी जाहीर

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीमध्ये 37 जणांना संधी देण्यात आली आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी आज (शनिवारी) चिंचवड येथे कार्यकारिणी जाहीर केली.

युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या उपस्थितीत चिंचवड येथे बैठक पार पडली. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक नाना काटे, तसेच नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

कार्यकारिणी पुढील प्रमाणे
युवक उपाध्यक्षपदी किरण पवार, रुपेश मोरे, प्रशांत सपकाळ, सागर सुतार, पंकज चोपदार, ऋषिकेश तापकीर, विकास शेट्टी, सौरव घुले, श्रीकांत काटे, विनायक काळभोर यांची निवड झाली आहे. सरचिटणीसपदी नितिन कांबळे, अमित नांगरे, सचिन राऊत यांची निवड झाली आहे. संघटकपदी आकाश जाधव, मंगेश असवले, महेश किवळे, तुषार सोनवणे, शादाब खान यांची निवड झाली आहे. सरचिटणीसपदी स्वप्निल तापकीर, संदीप अडसूळ, महेश चौधरी, हर्षद म्हेत्रे, महेश माने, गणेश फुंडे, रमनदिपसिंग कोहली, असिफ शेख यांची निवड झाली आहे.

सोशल मिडिया सरचिटणीसपदी शिवराज रणनवरे, रोहीत कदम, सौरभ साकोरे, संकेत दागट यांची निवड झाली आहे. चिंचवड विधानसभेच्या सरचिटणीसपदी किशोर पाटोळे, काशिनाथ तेलंग (दाताळकर), समीर साबळे, संघटक अभिलाष कांबळे, उपाध्यक्ष राहूल अंबवले यांची निवड झाली आहे.