एनसीइआरटीच्या पुस्तकात १३०० पेक्षा अधिक बदल

0

नवी दिल्ली-राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीइआरटी)च्या १८२ पाठ्यपुस्तकांमध्ये यंदा १३३४ पेक्षा अधिक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये राष्ट्रीय प्रतिकांवर भर देण्यात आला असून यामध्ये आता बाजीराव पेशवा आणि महाराणा प्रताप यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. मात्र, भगतसिंह यांच्या धड्यामधील कॉम्रेड हे शब्द हटवण्यात आले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

संस्कृत पुस्तकांची निर्मिती
एनसीइआरटीने ५७३ सायन्सची पुस्तके, ३१६ सामाजिक शास्त्राची आणि १६३ संस्कृत पुस्तकांची निर्मिती केली आहे. इयत्ता ६वी ते १०वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये काही नव्या बाबींसह, दुरुस्त्या आणि माहितीत नवी भर टाकण्यात आले आहे.

नव्या गोष्टींवर भर
या बदलांसह आणलेल्या या नव्या पुस्तकांमध्ये नव्या गोष्टींवर भर देण्यात आला असून यामध्ये राष्ट्रीय नेते असलेले मराठा सम्राज्याचा पेशवा बाजीराव बल्लाळ, जाट राजे सुरजमल, राजपुतांचे आदर्श महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यसैनिक लाला लजपतराय आणि वल्लभभाई पटेल तसेच आध्यात्मिक गुरु श्री अरुबिंदो आणि स्वामी विवेकानंद यांचा समावेश इतिहासाच्या पुस्तकात करण्यात आला असून त्यांच्यासाठी अधिक जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.