एनडीए परिवार वाढला कमी झाला नाही-अमित शहा

0

नवी दिल्ली-भाजप व मित्र पक्ष मिळून असलेले राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सद्य स्थितीत देशातील सर्वात मोठी आघाडी आहे. मात्र ही आघाडीतील पक्षाची संख्या कमी होत चालल्याचे बोलले जात आहे. परंतु वास्तविक बघता एनडीए या आघाडीतील पक्ष कमी झाले नसून उलट वाढले आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष आघाडीतून बाहेर पडला मात्र ते गेल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री यांनी जेडीयू या पक्षासह एनडीएत प्रवेश केला. त्यामुळे एनडीएतील पक्षांची संख्या कमी झालेली नाही. एनडीए हा एक परिवार असून तो दिवसेंदिवस वाढत असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. २०१४ नंतर ११ पेक्षा अधिक पक्ष एनडीएचे भाग बनले असल्याचे त्यांनी सांगितले.