नवी दिल्ली : भारत जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी यो-यो फिटनेस टेस्टमध्ये नापास झालेल्या अंबाती रायडूऐवजी सुरेश रैनाला स्थान मिळाले आहे. याबाबतची घोषणा बीसीसीआयने केली आहे. तसेच मोहम्मद शमीपाठोपाठ यो-यो टेस्ट नापास झाल्यामुळे संघाबाहेर पडणारा अंबाती रायडू हा दुसरा खेळाडू ठरला आहे. मोहम्मद शमीला अफगाणिस्तान कसोटीतून माघार घ्यावी लागली होती.
जून 2016 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध एकदिवसीय सामन्यात रायुडूचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. नुकत्याच संपलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये यशस्वी फलंदाजी केल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यासाठी रायुडूचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. परंतु फिटनेस टेस्टमध्ये नापास झालेल्या अंबाटी रायडूला माघार घ्यावी लागली.
इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२०, ३ वन-डे आणि ५ कसोटी सामने खेळणार आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा वन-डे संघ –
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, सिद्धार्थ कौल, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार