‘नीट’चा निकाल जाहीर; नलिन खंडेलवाल देशात अव्वल

0

नवी दिल्ली: NEET -2019 परीक्षेचा निकाल आज बुधवारी जाहीर झाला आहे. यामध्ये राजस्थानच्या नलिन खंडेलवाल देशात अव्वल ठरला आहे. त्याने 720 मधून 701 गुण मिळविले आहे. तर दिल्लीच्या भाविक बंसलने दुसरा, तर उत्तर प्रदेशच्या अक्षत कौशिकने तिसरा क्रमांक पटकावला. महाराष्ट्राच्या सार्थक भट याने 720 पैकी 695 गुणांची कमाई करत देशात सहावा येण्याचा मान मिळवला. तर मुलींमध्ये माधुरी रेड्डी हिने टॉप केले असून तिचा ऑल इंडिया रॅक सातवा आहे. माधुरी रेड्डी हिने 720 मधून 695 गुणांची कमाई केली आहे. दरम्यान, पहिल्या 100 जणांमध्ये 20 मुलींचाही समावेश आहे. दिव्यांग श्रेणीमध्ये उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशच्या सभ्यता सिंग कुशवाला हिने टॉप केले. तिने 610 गुण मिळवत दिव्यांग श्रेणीतून पहिले येण्याचा मान मिळवला.

NEET -2019 या परिक्षेसाठी 15,19,375 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 7,97,042 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. 5 मे रोजी नीट परीक्षा घेण्यात आली होती. परंतु फॅनी वादळाच्या तडाख्यामुळे कर्नाटकातील विद्यार्थ्यांसाठी 20 मे रोजी पुन्हा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

निकाल जाहीर झाल्यानंतर आता गुणांच्या आधारावर कौन्सिलिंग आणि अंडरग्रेजुएट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश होणार आहे. NEET 2019 Result जारी झाल्यानंतर मेडिकल कौन्सिलिंग कमिटी एमसीसीच्या होमपेजवर नीट कौन्सिलिंग 2019 ची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

टॉप 10
*नलिन खंडेलवाल – 701 – राजस्थान
*भाविक बंसल – 700 – दिल्ली
*अक्षत कौशिक – 700 – उत्तर प्रदेश
*स्वास्तिक भाटिया – 696 – हरियाणा
*अनंत जैन – 695 – उत्तर प्रदेश
*सार्थक भट – 695 – महाराष्ट्र
*माधुरी रेड्डी जी – 695 – तेलंगण
*ध्रुव कुशवाहा – 695 – उत्तर प्रदेश
*मिहिर राय – 695 – दिल्ली
*राघव दुबे – 691 – मध्य प्रदेश