साईबाबा मुंबई इंडियनला पावले

0

पुणे-आयपीएलच्या अकराव्या मोसमात ६ सामन्यापैकी मुंबई इंडियनने केवळ एक सामना जिंकला होता. वारंवार मुंबईला पराभवाचा सामना करावा लागत होता. मुंबईला विजय मिळावे यासाठी संघाच्या मालकीण नीता अंबानी यांनी साईबाबाला साकडे घालत विजयाची प्रार्थना केली.अखेर ही प्रार्थना फळाला आली. शनिवारी पुण्यात चैन्नई विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईच्या संघाने चेन्नईचा आठ गडी राखत पराभव केला. पुण्यात सामना सुरु असताना नीता अंबानी पुण्यात होत्या, मुंबईच्या विजयासाठी प्रार्थना करण्यासाठी आपण येथे आल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्याच्या एमसीए स्टेडीयमवरच्या सामन्यात चैन्नईने मुंबईला विजयासाठी १७० धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान मुंबईने दोन चेंडू आठ गडी राखून पार केले. कर्णधारपदाला साजेल अशी कामगिरी रोहित शर्मा याने केले. त्याने नाबाद ५६ धावची खेळी केली. त्यात ६ चौकार व २ षटकार ठोकले आहे. सुर्याकुमार यादवने ४४ आणि एविन लुईसने ४७ धावांची खेळी करत विजय मिळवून दिले.