मुंबई:केंद्रीय गृहमंत्री भाजपचे नेते अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहे. कलम ३७० रद्दच्या विषयावर अमित शहांचे व्याख्यान झाले. यात अमित शहांनी कॉंग्रेसवर निशाणा साधत, दिवंगत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लक्ष केले. नेहरूंच्या चुकीमुळे आजही पाक व्याप्त काश्मीरचा मुद्दा कायम असल्याचे घणाघाती आरोप अमित शहा यांनी केले. १९४७ ला नेहरूंनी अकाली युद्धबंदीचे आदेश दिले नसते तर आज पाक व्याप्त काश्मीरचा प्रश्न राहिला नसता असे अमित शहा यांनी म्हटले आहे.
आम्ही ३७० वरून राजकारण करत नाही तर समाजकारण करत आहोत असेही अमित शहा यांनी सांगितले. कॉंग्रेस नेते राहुल गांधी जम्मू-काश्मीर मुद्द्याचा भाजपकडून निवडणुकीसाठी वापर केला जातो असल्याचे आरोप करतात, मात्र राहुल गांधी हे राजकारणात नवखे आहे, आमच्या तीन पिढीने जम्मू-काश्मीरसाठी प्राण गमविले असल्याचा टोला अमित शहा यांनी लगावला.