किनगाव राष्ट्रीयध्वजाचा अवमान करणाऱ्या ग्रामसेवकास त्वरीत निलंबीत करुन सरपंच यांना पद मुक्त करा निळे निशाण संघटनेची मागणी

यावल प्रतिनिधी l

तालुक्यातील किनगाव ग्राम पंचायतच्या राष्ट्रीय ध्वजस्तंभाच्या ठीकाणी दुसरे ध्वज फडकावुन राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करण्यात आला असुन , याबाबत पंचायत समिती प्रशासनाने येत्या दोन दिवसात सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाही न केल्यास निळे निशाण या सामाजीक संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी दिला आहे . या संदर्भात निळे निशाण सामाजिक संघटनेद्वारा यावल पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांना देण्यात आलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की , किनगाव ग्राम पंचायतच्या कार्यालया समोर शासनाने राष्ट्रीय ध्वज करीता निर्धारीत केलेल्या ठीकाणी ग्रामपंचायत प्रशासनाने जाणीव पुर्वक जातीपातीचे वाद निर्माण करण्याच्या उद्देशाने त्या ठीकाणी कार्यरत असलेले ग्रामसेवक, सरपंच सदस्य यांनी संगनमताने राष्ट्रीय ध्वजा करीता शासनाने निर्धारित केलेल्या जागेवर भगव्या रंगाचा ध्वज लाऊन ईतर जातीधर्माच्या लोकांच्या भावना भडकावुन सामाजिक सलोखा बिघडवुन जातीधर्मात तेड निर्माण केलेला आहे . राष्ट्रीय ध्वजाच्या जागी भगवा झेंडा लावुन राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केलेला आहे . तरी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी तात्काळ अशा प्रकारे बेजबाबदारीने कार्यकरणाऱ्या ग्रामसेवक आणी सरपंच व त्यांचे सहकारी यासंबधीतांवर कठोर कारवाई करून संबधीत ग्रामसेवकास तात्काळ निलंबीत करून सरपंच यांना पदमुक्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे , संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे . युवकचे तालुका अध्यक्ष सतिष अडकमोल , महीला मंचच्या तालुका अध्यक्ष लक्ष्मीबाई मेढे, अनिल इंधाटे , तालुका उपाध्यक्ष अमोल तायडे यांनी केली असून, संबधितांवर दोन दिवसात पंचायत समिती प्रशासनाने कारवाई न केल्यास निळे निशाण संघटनेच्या माध्यमातुन पंचायत समिती आवारात आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे .