1, 2, 5, 10, 20 रुपयांची नवी नाणी चलनात येणार

0

नवी दिल्ली: आज मोदी सरकार 2 च्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सितारमण लोकसभा सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी मोठ मोठ्या घोषणा करत सर्वांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान अर्थसंकल्प मांडताना त्यांनी 1, 2, 5, 10, 20 रुपयांची नवी नाणी चलनात येणार असल्याची माहिती दिली. अर्थसंकल्प सादरीकरणाच्या शेवटच्या टप्प्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व करदात्यांचे, जबाबदार नागरिकांचे आभार मानले.

http://loksabhatv.nic.in/

ठळक अर्थसंकल्प
*इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी 12 ते 5 टक्क्यांवर
*इलेक्ट्रिक वाहन घेणाऱ्यांना विशेष कर सवलत
*400 कोटी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कंपन्यांना दिलासा
*सरकारी कंपन्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी पावलं उचलणार
*गेल्या पाच वर्षांत प्रत्यक्ष करात मोठी वाढ
*गेल्या वर्षभरात एनपीएमध्ये 1 लाख कोटी रुपयांची घट
*राष्ट्रीय बँकांना 70 हजार कोटींची मदत
*2019-20 मध्ये 4 नवे दूतवास सुरू करणार
*तरुणांना महात्मा गांधींची मूल्यं समजावीत यासाठी गांधीपिडीया तयार करणार
*अनिवासी भारतीयांना आधार कार्ड देणार; त्यांना 180 दिवस वाट बघावी लागणार नाही
*35 कोटी एलईडी बल्बचे वाटप केले जाणार आहे, त्यातून 18,341 कोटींच्या विजेची बचत होईल
*स्टार्ट अप इंडियासाठी टीव्ही चॅनल सुरू करणार असल्याचीही घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली याद्वारे तरूणांना मार्गदर्शन दिले जाणार आहे.
*रोबो आणि विशेष मशिन्ससाठी बँका अर्थसहाय्य करणार
*सर्वांना स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी जल शक्ती मंत्रालयाची स्थापना
*खेलो भारत योजनेचा विस्तार करणार; राष्ट्रीय क्रीडा शिक्षण बोर्डाची स्थापना करणार
*स्वच्छ भारत योजनेमुळे 5.6 लाख गावं हागणदारीमुक्त
*2 ऑक्टोबर 2019 पर्यंत देश हागणदारीमुक्त होणार
*स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी दूरदर्शनचं स्वतंत्र चॅनेल सुरू करणार
*2 ऑक्टोबर 2014 पासून 9.6 कोटी शौचालयांची निर्मिती