नवी दिल्ली-आज नवीन वर्षापासून अनेक वस्तू स्वस्त होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात गोड झाली असे म्हणायला हरकत नाही. सिनेमा तिकीट, मानिटर स्क्रीन, पावर बँक आणि ३२ इंचाच्या टीव्ही संचासह २३ वस्तू स्वस्त करण्यात आल्या आहेत. २२ डिसेंबर रोजी जीएसटी परिषदने २३ वस्तूवरील कर कमी केला होता. आजपासून त्याची आमंलबजावणी होणार आहे.
डिजिटल कॅमेरा, मोबाइलच्या पॉवर बँक, व्हिडीओ कॅमेरा रेकॉर्डर्स, व्हिडीओ गेम कन्सोल्स, वाहनांचे ट्रान्समिशन शाफ्ट्स आणि क्रँक्स, गिअर बॉक्स, पुनप्र्रक्रिया केलेले टायर आदी वस्तूंवर आता २८ टक्क्यांऐवजी १८ टक्के जीएसटी करण्यात आला आहे. १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सिनेमा तिकिटांवरील जीएसटी २८ वरून १८ टक्के, तर १०० रुपयांपेक्षा कमी मूल्याच्या तिकिटांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व वस्तू आता स्वस्त झाल्या आहेत.
असे आहे नवीन जीएसटी दर
हवाबंद डब्यात गोठवून ठेवलेल्या ब्रॅण्डेड भाज्या आणि संरक्षित केलेल्या भाज्या (लगेच खाण्यायोग्य नसलेल्या) वरील ५ टक्के जीएसटी रद्द
अपंगांच्या व्हिलचेअरसह सर्व वस्तू आणि त्यांचे सुटे भाग यांच्यावर जीएसटी २८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर
संगमरवर दगडावरील १८ टक्के जीएसटी ५ टक्क्यांवर
चालण्यासाठीची आधारकाठी, लाकडी बूच, राखेपासून बनवलेल्या विटांवरील जीएसटी १२ वरून ५ टक्क्यांवर
संगीतावरील पुस्तकांचा कर १२ वरून शून्यावर
जीएसटी कमी केलेल्या सेवा
मालवाहू वाहनाच्या विमा हप्त्यावरील जीएसटी १८ वरून १२ टक्क्यांवर
जनधन योजनेतील ठेवींसाठी बँकातर्फे देण्यात येणाऱ्या सेवा जीएसटीमुक्त
धार्मिक यात्रांच्या विशेष विमान तिकिटावरील जीएसटी इकॉनॉमी क्लासएवढाच
बायोगॅस प्रकल्प, सौरऊर्जेवरील उपकरणे, सौरऊर्जा निर्मिती यंत्रणांवर ५ टक्के जीएसटी. अशा प्रकल्पांसाठी लागणाऱ्या वस्तू आणि सेवांवर पूर्वीप्रमाणेच जीएसटी लागू.
२८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर