नवीन वर्षात बँकिंग क्षेत्राला येणार अच्छे दिन; थकीत कर्जात होण्याची शक्यता

0

नवी दिल्ली-थकीत कर्जाचा सामन्या करावा लागत असलेल्या बँकिंग क्षेत्राला या नव्या वर्षात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. थकीत कर्जाची संपूर्ण आकडेवारी बँकांनी आपल्या खात्यात नोंद करून ठेवावी म्हणून आग्रही असलेल्या रिझर्व्ह बँकेने बँकींग क्षेत्रासाठीचा वाईट काळ निघून गेला असून, चालू आर्थिक वर्षात बँकांच्या थकीत कर्जामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. ही बाब खरी झाल्यास २०१५ नंतर प्रथमच बँकांच्या एनपीएनमध्ये घट नोंदवली जाणार आहे.

२०१५ पासूनच रिझर्व्ह बँकेने थकीत कर्जाच्या वसुलीबाबत कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली होती.

मार्च २०१९ पर्यंत एकूण बॅड लोनचा आकडा घटून एकूण कर्जाच्या १०.३ टक्के राहील, असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये हा आकडा १०.०८ टक्के आणि मार्च २०१८ मध्ये हाच आकडा ११.५ टक्के इतका होता. याच काळात नेट एनपीएमध्येही घट झाली आहे.

आरबीआयने आपल्या १८ व्या फायनँशियल स्टेबिलिटी रिपोर्टमध्ये म्हटले आहे. शक्तिकांता दास यांनी आरबीआयच्या गव्हर्नरपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर आलेला हा पहिलाच स्टेबिलिटी रिपोर्ट आहे. बँकिंग स्टेबिलिटी इंडिकेटर बँकांच्या अॅसेट क्वालिटीमध्ये सुधारणा झाल्याचे दर्शवत आहे. मात्र प्रॉफिटेब्लिटीमध्ये घट होणे कायम आहे, असेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.