न्यूयार्क-न्यूयॉर्कचे अॅटर्नी जनरल एरिक स्कनेडीमर्न यांच्यावर चार महिलांनी लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले आहेत. ज्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. न्यूयॉर्कचा अॅटर्नी जनरल म्हणून लोकांची सेवा करण्याची संधी मला मिळाली हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मात्र माझ्यावर गंभीर आरोप झाले आहेत. या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असेही न्यूयॉर्कचे अॅटर्नी जनरल एरिक स्कनेडीमर्न यांनी म्हटले आहे.